गूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 

Updated: Oct 15, 2014, 02:20 PM IST
गूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल title=

मुंबई: महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही सर्वच पक्षांनी सोशल मीडियावरील प्रचारावर भर दिला होता. गूगलनं मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. 

गूगल या सर्च इंजिनमध्ये राज ठाकरे यांच्या नावानं सर्वाधिक सर्च दिला गेला असून त्याखालोखाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हेदेखील ऑनलाइन जगतामध्ये लोकप्रिय ठरले असले तरी ठाकरे बंधूंना मागे टाकण्यात ते अपयशी ठरले आहेत. 

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नावानं सर्च देण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. तर तिकडे हरियाणात ओमप्रकाश चौटाला गूगल सर्चमध्ये अव्वल आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.