विधानसभा 2014

मतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

Oct 13, 2014, 08:39 PM IST

प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी

युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती. 

Oct 13, 2014, 07:21 PM IST

मनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं. 

Oct 13, 2014, 04:15 PM IST

खडसे युतीचे मारेकरी, त्यांच्या डोक्यात मस्ती गेली – उद्धव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसेंबर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे.

Oct 13, 2014, 03:22 PM IST

काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला. 

Oct 13, 2014, 01:37 PM IST

हे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच!

मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. 

Oct 11, 2014, 03:34 PM IST

जेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...

हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते. 

Oct 3, 2014, 04:20 PM IST

भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 

Oct 2, 2014, 04:37 PM IST