ठाणे: वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत. अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.
क्षेत्रीय अधिकारी अशोक मांद्रे यांनी आपल्या राहत्या घरी ही मतदान यंत्रे ठेवली होती. विशेष म्हणजे ही यंत्रे मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या पत्नीसह शासकीय कार्यालयात घेवून जायाला ते निघाले. त्याचवेळी वसईचे आमदार विवेक पंडीत यांनी धाव घेतली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतलं.
या दोन्ही इव्हीएम मशीन्स राखीव मशीन्स असल्याची माहिती तहसिलदारांनी दिलीय. नियमानुसार इव्हीएम मशीन्स घरी ठेवता येत नाहीत. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन तहसिलदारांनी दिलंय. तर उमेदवार विवेक पंडित यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.