गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर

गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 3, 2012, 04:40 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. हिमचालमध्ये ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
गुजरात, हिमाचल प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये एकाचवेळी निवडणुका होणार आहे. गुजरातमध्ये ३.७८ कोटी तर हिमाचल प्रदेशात ४५.१६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गुजरातमध्ये १८२ तर हिमाचलमध्ये ६८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
पहिल्या टप्प्याचे १३ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे १७ डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमधील दोन्ही टप्प्यातील मतमोजणी तसेच हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी २० डिसेंबरला मतमोजणी होईल.
राजकीय पक्षांनी या दोन्ही राज्यांमध्ये आधीच निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जोरदार सक्रिय झाले आहे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सध्या राज्याचा दौरा करीत असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज राजकोट येथे सभा घेऊन पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी काँग्रेसनेच गुजरातचा विकास केल्याचे म्हटले आहे.