www.24taas.com,नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमाल आणि वीरभद्र सिंग या बड्या राजकीय हस्तींमध्ये मतदारांना आकर्षित करण्याची चुरस सुरूए. काँग्रेस आणि भाजप सर्व म्हणजे ६८जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं १२ जागांवर उमेदवार उभे केलेत. तर शिवसेनाही चार जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १०५ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत.
हिमाचल प्रदेशात सत्तापालटाच्या भावनेपेक्षा मतदारांच्या दृष्टीने दरवाढ आणि भ्रष्टाचार हे मुद्दे अधिक प्रभावी असल्याचं दिसून येतंय. हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री धुमाल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळण्याची आशा आहे. त्यामुळं भाजप बाजी मारते की काँग्रेस उत्तराखंडची पुनरावृत्ती करते याबाबत उत्सुकता आहे.