हिमाचलमध्ये ७०% मतदान

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2012, 11:50 PM IST

www.24taas.com, सिमला
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत. शिवसेनेचेही चार उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तब्बल 105 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमाल आणि वीरभद्र सिंग या बड्या राजकीय हस्तींमध्ये मतदारांना आकर्षित करण्याची चुरस सुरू होती. काँग्रेस आणि भाजपने सर्व म्हणजे ६८ जागा लढवल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली. राष्ट्रवादीनं १२ जागांवर उमेदवार उभे केलेत. तर शिवसेनाही चार जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १०५ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले.
हिमाचल प्रदेशात सत्तापालटाच्या भावनेपेक्षा मतदारांच्या दृष्टीने दरवाढ आणि भ्रष्टाचार हे मुद्दे अधिक प्रभावी असल्याचं दिसून येतंय. हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री धुमाल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळण्याची आशा आहे. त्यामुळं भाजप बाजी मारते की काँग्रेस उत्तराखंडची पुनरावृत्ती करते याबाबत उत्सुकता आहे.