उत्तर मुंबईत लोकसभेची काँग्रेसला निवडणूक जड
उत्तर मुंबईमधली लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. खरं तर या मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचं नामोनिशाणही नव्हतं. पण गोविंदा निवडणुकीला उभा राहिला आणि हे चित्र बदललं. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे. पण आता या निवडणुकीत चित्र बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Apr 11, 2014, 09:34 PM IST`पवारांच्या बैठकीनंतर राणेंसाठी प्रचार करायचा का?`
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंडखोरीचं निशाण उभारणाऱ्या सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्ष नेत्यांना फारसं यश मिळाल नाही. नाराज कार्यकर्त्यांची उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच नारायण राणे यांच्याकरिता प्रचार करायचा की नाही याबाबतचा निर्णय राष्ट्रावादीचे कार्यकर्ते जाहीर करणार आहेत.
Apr 11, 2014, 07:19 PM ISTराणेंविरोधात भूमिका घेणाऱ्या सावंत यांना पक्षाची नोटीस
उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.
Apr 11, 2014, 06:23 PM ISTवाजपेयींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसचा मोदींवर निशाणा
`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.
Apr 11, 2014, 03:17 PM ISTस्वार्थासाठी सेनेला बाळासाहेबांचा विसर - पवार
`शिवसेनेलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला आहे.
Apr 11, 2014, 01:28 PM ISTमुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.
Apr 11, 2014, 01:26 PM ISTपरभणी लोकसभा : मराठा कार्ड कोणाला तारणार
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९८चा अपवाद वगळता १९८९ पासून आजतागायत या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. नेहमीप्रमाणे यंदाही शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होतेय. या निवडणुकीत मराठा कार्डचं वोटींग महत्वाचं आहे.
Apr 10, 2014, 10:58 PM ISTएकाच कुटुंबातील 301 सदस्यांनी केलं मतदान
आसामच्या तेजपूर मतदार क्षेत्रातील सुदूर गावामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 301 सदस्यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे सर्व मतदार एकाच कुटुंबातले असून एकाच गावातही राहतात. त्यांचे पुर्वज नेपाळहून येवून इथं स्थायिक झाले होते.
Apr 10, 2014, 08:10 PM ISTअबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब
अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 10, 2014, 07:33 PM ISTसोहा अली खाननं मतदानासाठी सोडलं आयफा अॅवॉर्ड्स
अभिनेत्री सोहा अली खानचं म्हणणं आहे तिला 24 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यामुळं या महिन्याच्या अखेरीस फ्लोरिडाच्या टेंपा बेमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी म्हणजेच `आयफा` अॅवॉर्ड्स सोहळ्याला तिनं जाण्याचं रद्द केलंय.
Apr 10, 2014, 06:05 PM ISTराणेंना राष्ट्रवादीची ठसन कायम, प्रचारास नकार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली ठसन अजूनही कायम आहे. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांना मदत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार कायम आहे.
Apr 10, 2014, 05:04 PM ISTआधी बोटावर शाई; मग, लगीनघाई!
नागपूरमध्ये मतदार किती जागरुक आहेत त्याचं उदाहरण आज पाहायला मिळालं. बोहल्यावर चढलेली वधू आपलं लग्न मागे ठेऊन पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन उभी राहिली.
Apr 10, 2014, 02:21 PM ISTकमी उंचीच्या महिलेचं मतदानात मोठं योगदान
नागपूराची ज्योती आमगे या जगातील सर्वांत कमी उंचीच्या मुलीने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावलाय.
Apr 10, 2014, 02:13 PM ISTअभिनेता परेश रावल गुजरातमध्ये सर्वांत श्रीमंत उमेदवार
भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.
Apr 10, 2014, 01:42 PM ISTपत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
Apr 10, 2014, 07:42 AM IST