39 पत्नी असलेल्या चानाची निवडणुकीत मागणी वाढली
लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.
Apr 16, 2014, 03:54 PM ISTसलमानच्या वडिलांनी काढली मोदींची उर्दू वेबसाइट
बॉलिवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, लेखक सलीम खान यांनी आपल्या घरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उर्दू वेबासाइट लॉन्च केलीय. त्यामुळं आता उर्दूतही `नमो नमो` असेल.
Apr 16, 2014, 02:52 PM ISTपुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.
Apr 16, 2014, 12:52 PM ISTपहिले आपल्या पापांचा हिशोब द्या, मोदींनी काँग्रेसला ठणकावलं
नरेंद्र मोदी आणि 2002ची गुजरात दंगल हा विषय काही केल्या संपत नाही. मोदींनी माफी मागावी हा विषय पुन्हा एकदा पुढं आलाय. त्यावर माझ्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या काँग्रेसनं आधी आपल्या पापांचा हिशेब द्यावा, असा हल्ला चढवत मोदींनी माफीसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय.
Apr 16, 2014, 11:49 AM ISTमंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.
Apr 16, 2014, 09:53 AM ISTहुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!
राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.
Apr 16, 2014, 09:34 AM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM ISTनिवडणुकांमुळे खाजगी उड्डानसेवेला सुगीचे दिवस
निवडणुकीचे दिवस आहेत... त्यामुळे बरेच धंदे तेजीत आहेत. त्यापैंकीच एक व्यवसाय म्हणजे खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर भाड्यानं देण्याचा... या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हणायला हरकत नाही.
Apr 15, 2014, 01:59 PM ISTसुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध
"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.
Apr 15, 2014, 12:16 PM ISTनाशिकमध्ये `पॉलिटिकल लव्ह ट्रँगल`!
लव्ह ट्रँगल... हा बॉलीवूड सिनेमांचा हिट फॉर्म्युला... सध्या असाच राजकीय प्रेमाचा त्रिकोण सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतोय.
Apr 15, 2014, 12:12 PM ISTउद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे
एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.
Apr 15, 2014, 08:56 AM ISTनिलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर
रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.
Apr 14, 2014, 02:16 PM ISTमोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..
राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.
Apr 14, 2014, 12:40 PM ISTमोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!
नरेंद्र मोदी असो किंवा रजनीकांत... दोघांचं व्यक्तीमत्व कल्पनेपेक्षा भारी... रजनीकांत आपल्या सिनेमांमुळे नाही तर त्यांचे सिनेमा त्यांच्या नावावर चालतात.. सध्या मोदींबाबत एक गोष्ट कानावर पडते की ते पक्षामुळे नाहीत.. तर पक्ष मोदींमुळे आज या स्थितीत आहे.. या दोघांची लोकप्रियता त्यांना सर्व क्षेत्रात मानली जाते.. मग ते जोक्स आणि विनोदाच्या दुनियेत कशी नसेल...
Apr 14, 2014, 10:26 AM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM IST