नाशिकमध्ये महाआघाडी ?

नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.

Updated: Jan 27, 2012, 10:52 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.

 

नाशिक महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. आता इतर छोट्या पक्षांना आघाडीत घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र छोट्या पक्षांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची पुरती दमछाक होत आहे. चर्चा सुरू असतानाच माकपनं परस्पर ७ जागांवरचे त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही इच्छुकांची गोची झाली आहे. माकपनं दोन तीन जागांवरचे उमेदवार मागे घ्यावेत, अशी आघाडीच्या नेत्या मागणी आहे. माकपला मात्र हे मान्य नाही.

 

भारिप बहुजन महासंघानं आघाडीकडं १५ तर भाकपनं २ जागांची मागणी केली आहे. जागावाटपावरुन गोंधळ असला तरी महाआघाडी होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना वाटत आहे. नाशकात अजूनही काही वॉर्डात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच वाद सुरू आहे. असं असताना इतर पक्षांना सोबत घेणं त्यांना किती शक्य होतं, यावरच महाआघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.