राजीनामा

आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

Sep 21, 2012, 11:23 AM IST

मनसेची मागणी, कोळसा घोटाळा मंत्री राजीनामा द्या

कोळसा घोटाळ्यात हात काळे झालेल्या राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी पहिल्यांदाच मनसेनं केली. त्यामुळे आता मनसेने कोळसा घोटाळ्यावरही आवाज उठविला आहे.

Sep 8, 2012, 08:50 PM IST

राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर

नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.

Aug 31, 2012, 05:30 PM IST

पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम

पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.

Aug 27, 2012, 10:26 PM IST

`राज` मी नाही देणार `राजीनामा` - आर. आर. पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र `मी राजीनामा देणार नाही` असं उत्तर आर. आर. पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

Aug 21, 2012, 08:28 PM IST

देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.

Aug 8, 2012, 03:00 AM IST

शरद पवार नाराज, राजीनामा देण्याची शक्यता!

ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Jul 19, 2012, 10:25 PM IST

जोशींचा राजीनामा आधी, मग मुंबईत आले मोदी!

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.

May 24, 2012, 08:02 PM IST

मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनसेच्या दक्षिण मुंबईतल्या सहा विभागअध्यक्षांनी राजीनामे दिलेत. महापालिका निवडणुकीत संबंधित विभागात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत.

Feb 29, 2012, 03:52 PM IST

'बाळा नांदगावकर राजीनाम्यावर शिक्कामोर्तब'

मनसे आमदार बाळा नांदगावकर विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सल्लागार समिती बैठकीला नांदगावकर गैरहजर राहिल्याने याला आता दुजोरा मिळाला आहे.

Feb 22, 2012, 08:41 AM IST

'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले

कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लिल चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.

Feb 8, 2012, 10:55 AM IST

मालदीवच्या अध्यक्षांचा राजीनामा

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे आज दूरचित्रवाणीवरून जाहीर केले. त्यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष डॉ. वाहीद यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, देशात निदर्शने केल्याच्याविरोधात हा राजीनामा असल्याचे सांगण्या येत आहे.

Feb 7, 2012, 04:29 PM IST

ठाण्यात सेनेने पाडले राष्ट्रवादीला खिंडार!

ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुभाष भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सांगितले आहे.

Jan 9, 2012, 07:48 PM IST

गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.

Nov 22, 2011, 10:32 AM IST

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

Oct 18, 2011, 07:11 AM IST