जोशींचा राजीनामा आधी, मग मुंबईत आले मोदी!

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.

Updated: May 24, 2012, 08:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.

संजय जोशी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मुंबईत आज बैठक सुरू होण्यापूर्वी काहीवेळ आधी जोशी यांनी राजीनामा दिला. पक्ष हितासाठी राजीनामा दिल्याचं जोशी यांनी प्रतिक्रिया दिलीय. मात्र जोशी यांच्यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नाराज होते. त्यामुळं आजच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा इशारा मोदींनी दिला होता.

मोदी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षातून करण्यात आला. मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी भाजपला संजय जोशींचा राजीनामा घ्यावा लागाला. उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराला मोदींना न येऊ देण्यात जोशींचा हात असल्याचं बोललं जाते आहे. त्यामुळंच मोदी जोशींवर नाराज असल्याचीही चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. संजय जोशी हे आरएसएस आणि नितीन गडकरींचे जवळचे मानले जातात.