मराठी चित्रपट

मराठी चित्रपटांना धक्का, पुण्यातील ‘प्रभात’ टॉकीज बंद होणार

मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या पुण्यातील प्रभात चित्रपटगृह बंद होणार असल्याची माहिती आहे. गेल्या ८० वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठीचा हक्काचा पडदा म्हणून परिचित असलेलं प्रभात पाडलं जाणार असल्याची चर्चा आहे. 

Dec 3, 2014, 02:30 PM IST

जब्याच्या ८० वर्षाच्या आजीने पाहिला फँड्री

सध्या तरुणांवर गारुड आहे ते फँड्री या मराठी चित्रपटाचं.. मात्र या फँड्रीचा दुसरा अंक उल्हासनगरमध्ये पहायला मिळाला...
ही दृश्य आहेत जब्या अर्थात फँड्रीमधील बाल कलाकार सोमनाथ अवघडे याच्या तारा आजीची...

Feb 20, 2014, 08:39 AM IST

मराठी चित्रपटात आता कॅब्रे साँग

`हॅलो नंदन` हा चित्रपट पुढच्या महिन्यात रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं वैशिष्टय़ असेल कॅब्रे साँग. आपल्या लेखणीनं महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या गीतकार गुरू ठाकूरनं चित्रपटात हिंदी कॅब्रे साँग लिहलयं. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नृत्यांगना `कॅट`वर या गाण्याचे चित्रिकरण झाले आहे. संगीतकार व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलयं. कॅब्रे साँग हे हिंदी गाणं गायिका नीती मोहन यांनी गायलं आहे.

Feb 7, 2014, 09:46 PM IST

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!

मराठी सिनेजगतात प्रथमच तीन आठवड्यात ३० कोटींची विक्रमी कमाई करुन `टाइमपास` या सिनेमानं इतिहास रचलाय. एस्सेल व्हिजन निर्मित `टाइमपास` या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमी नोंद केली आहे.

Jan 25, 2014, 08:02 AM IST

लक्ष द्या - ‘रंगकर्मी’ चित्रपटाचे जिंका तिकीटं!

रंगकर्मी तिकीट जिंका स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका रंगकर्मी चित्रपटाच्या मुंबईतील प्रिमिअरची तिकिटे...
त्यासाठी तुम्हांला खालील दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.

Dec 21, 2013, 09:58 AM IST

खूशखबर! मराठी चित्रपट, नाटकांच्या अनुदानात वाढ

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या नव्या धोरणानुसार मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलीय. मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या निर्मिताच्या पहिल्या सिनेमालाही आता अनुदान मिळणार आहे.

Oct 30, 2013, 08:36 AM IST

येवा नारबाची वाडी आपलीचं असा...

तुम्ही जर कोकणवासी असाल तर नारबाची वाडी तुम्हाला नक्कीच आपलंस करेल...आणि तुम्ही जर कोकणवासी नसाल...कोकणाशी दूर दूर संबंध नसेल तरीही ही नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल....मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी सिनेमा...

Sep 19, 2013, 08:55 PM IST

सांगा तुमच्या प्रेमाची गोष्ट चारोळीत..

ज्याला वय नाही... ज्याला बंधन नाही.. ज्याला जात-पात नाही... अशा प्रेमी युगुलांसाठी `झी २४ तास` वृत्तवाहिनीनं आयोजित केलीय एक कॉन्टेस्ट... मग विचार कसला करताय... व्यक्त करा तुमचं प्रेम...

Jan 19, 2013, 01:41 PM IST

अक्षयकुमार पडला प्रेमात, काढणार मराठी चित्रपट

अभिनेता अक्षयकुमार पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अहो... म्हणजे मराठी भाषेच्या प्रेमात पडला आहे.

Oct 8, 2012, 06:08 PM IST

मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'

संदीप साखरे

सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.

Mar 7, 2012, 08:17 PM IST

अनिल कपूरचं "मराठी प्रेम'

अनिल कपूरनेही मराठी सिनेमाची निर्मिती करायला आवडेल असं मत व्यक्त केलंय. मात्र आपली फक्त ही इच्छा व्यक्त करून अनिल थांबला नाही. तर याआधीही मराठी सिनेमाची निर्मिती करण्याचं काम आपण हाती घेतलं होतं असा खुलासा अनिलने यावेळी केला.

Mar 7, 2012, 09:09 AM IST

'शर्यत'चा म्युझिक लाँच

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

Dec 3, 2011, 06:01 PM IST

स्वप्न 'सिद्धार्थ नि सौमिल'चे

'सिद्धार्थ-सौमिल' या द्वयीने 'स्वप्न तुझे नि माझे' या सिनेमाला संगीत दिलंय.यातील सिद्धार्थ म्हणजे गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन. 'स्वप्न तुझे नि माझे' या मराठी सिनेमाद्वारे तो संगीतकार म्हणून आपल्यासमोर येतोय.

Nov 23, 2011, 06:04 AM IST

'दुभंग' आणि 'स्वराज्य' सज्ज

या शुक्रवारी रिलीज झालेल्या 'दुभंग' आणि 'स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे' या दोन्ही सिनेमांचे प्रीमिअर गुरुवारी मुंबईत पार पडले.

Nov 11, 2011, 02:19 PM IST