येवा नारबाची वाडी आपलीचं असा...

तुम्ही जर कोकणवासी असाल तर नारबाची वाडी तुम्हाला नक्कीच आपलंस करेल...आणि तुम्ही जर कोकणवासी नसाल...कोकणाशी दूर दूर संबंध नसेल तरीही ही नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल....मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी सिनेमा...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 19, 2013, 09:14 PM IST

www.24taas.com, मीनल दाभोलकर, प्रोड्युसर
सिनेमा- नारबाची वाडी
दिग्दर्शक- आदित्य सरपोतदार
निर्मिती- फिल्म फार्म
संगीत- मंगेश धाकडे
गीत, पटकथा, संवाद- गुरु ठाकूर
कलाकार- दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, निखिल रत्नपारखी, विकास कदम, ज्योती मालशे, कमलाकर सातपुते...अतुल परचुरे

तुम्ही जर कोकणवासी असाल तर नारबाची वाडी तुम्हाला नक्कीच आपलंस करेल...आणि तुम्ही जर कोकणवासी नसाल...कोकणाशी दूर दूर संबंध नसेल तरीही ही नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल....मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी सिनेमा...
दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, निखिल रत्नपारखी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत....आणि प्रत्येकाने त्या चोख बजावलेल्याही आहे....त्यासाठी गेटअप...कोकणी भाषेचा लहेजा अगदी प्रत्येकाने आत्मसात करत संवाद फेक केली आहे.....उलाढाल, सतरंगी रे या सिनेमानंतर अगदी वेगळ्या स्टाईलचा हा सिनेमा करण्याचं आणि दिग्गज स्टारकास्ट घेण्याचं शिवधनुष्य आदित्य सरपोतदार याने अगदी चोख पेललंय....कोकणातल्या तांबड्या मातीतला आणि हिरव्यागार डोंगरातल्या सौदर्याबरोबरच कोकणी माणसाच्या रंगछटा अगदी योग्य पध्दतीने टीपल्यात ते कॅमेरामन राहुल जाधवने....त्यामुळे अगदी कलाकारांपासून ते तंत्रज्ञापर्यंत सगळ्यांचीच योग्य भट्टी जमल्यामुळेच या नारबाच्या वाडीत आपणही आपलीच वाडी असल्यागत काही काळ अगदी मजेत घालवत विसावतो...आणि हाच लेखक-दिग्दर्शक आणि कलाकारांचा प्लस पॉईंट ठरतो....त्यातच भर घालतं ते सिनेमातलं बॅगराऊंड म्युझिक आणि गुरु ठाकूरने लिहिलेली दोनच सिनेमातली अस्सल गाणी......सिनेमा पाहताना कुठेतरी मालगुडी डेजची आठवण होतेच....

काय आहे कथानक-
जुन्या काळातलं कोकण आणि त्याच कोकणातला साधा सरळ आपल्या वाडीवर अत्य़ंत प्रेम असणारा, त्याची राखण करणारा नारबा.....नारबाची वाडी...नारबा आणि खोत याभोवती या सिनेमाचं कथानक फिरतं....नारबाची वाडी मिळवण्यासाठी सुरुवातीला खोत ( मनोज जोशी) आणि त्यानंतर त्याचा मुलगा ( मनोज जोशी) कसा प्रयत्न करतात...त्यासाठी कसा करार होतो...नारबाच्या मरणाची कशी वाट पाहिली जाते...आणि अखेर नारबा मरतो का.... ती नारबाची वाडी खोताला मिळते का या सा-या भोवती अत्यंत खुमासदार पध्दतीने...कोकणी संवादाची मजा घेत सिनेमाची कथा खुलत जाते....
अभिनयाच्या अंगाने
दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार....आणि कितीही बोललं तरी ते कमीच आहे....अगदी आजोबा ते पणजोबापर्यंतचा त्यांचा या सिनेमातला प्रवास वेगळ्या गेटअप..मेकअप...हावभाव आणि पेहराव यामुळे अगदी चोख झालाय....तर अभिनेता मनोज जोशी यांनी या सिनेमात दोन वेगळ्या गेटअप मधले दोन रोल केलेत...तेही विशेष दाद देण्य़ासारखेच आहेत....तर सिनेमात असलेली इतर प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपली छोटी का होईना पण वेगळी ओळख निर्माण करते...निखिल रत्नपारखीने साकारलेलं कॅरेक्टरही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात मदत करतं...
शेवटी काय
तर कोणताही थिल्लरपणा... पाचकळपणा न करता हा सिनेमा केवळ तुमचं निखळ मनोरंजन करतो....थकल्याभागल्य़ा जीवाला कोकणाची सैर करत अगदी ताजंतवानं करतो....तेव्हा वेळ काढून नारबाच्या वाडीला भेट ही दिलीच पाहिजे....खूप दिवसांनी काही तरी वेगळं बघितल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल....
स्टार – साडे तीन ते चार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.