www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या तरुणांवर गारुड आहे ते फँड्री या मराठी चित्रपटाचं.. मात्र या फँड्रीचा दुसरा अंक उल्हासनगरमध्ये पहायला मिळाला...
ही दृश्य आहेत जब्या अर्थात फँड्रीमधील बाल कलाकार सोमनाथ अवघडे याच्या तारा आजीची... जब्याचं आजोळ उल्हासनगरचं.. त्यामुळे आपल्या मोठ्या नातवाला मोठ्या पडद्यावर पहाताना या माऊलीच्या डोळ्यांत अश्रू तरळले...
आपल्या ७५ वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच तारा आजी नातवाच्या कौतुकासाठी थिएटरची पायरी चढल्या. आवारात येताच त्याचं लक्ष सिनेमाच्या पोस्टरकडे गेलं आणि त्यांनी त्यावरच्या सोमनाथच्या चित्राचे पापे घेतले.
टॉकीजच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या सन्मानाने तारा आजींना खुर्चीत नेऊन बसवलं. त्यांच्यासोबत त्यांची दुसरी नातवंडं होती. उल्हासनगर मधील सामाजीक कार्यकर्ते राज आसरोंडकर यांनी हा योग घडवून आणला..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.