मराठी चित्रपटांना धक्का, पुण्यातील ‘प्रभात’ टॉकीज बंद होणार

मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या पुण्यातील प्रभात चित्रपटगृह बंद होणार असल्याची माहिती आहे. गेल्या ८० वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठीचा हक्काचा पडदा म्हणून परिचित असलेलं प्रभात पाडलं जाणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Dec 3, 2014, 08:25 PM IST
मराठी चित्रपटांना धक्का, पुण्यातील ‘प्रभात’ टॉकीज बंद होणार title=

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या पुण्यातील प्रभात चित्रपटगृह बंद होणार असल्याची माहिती आहे. गेल्या ८० वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठीचा हक्काचा पडदा म्हणून परिचित असलेलं प्रभात पाडलं जाणार असल्याची चर्चा आहे. 

इंदुरचे सरदार किबे यांच्या मालकिचे हे चित्रपटगृह आहे. ते त्यांनी विकण्याचे ठरविले आहे. त्या जागी कमर्शियल इमारत उभी राहाणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रभात इतिहासजमा होणार अशी चर्चा आहे. 

दरम्यान, प्रभातला वाचवण्यासाठी मराठी चित्रपट महामंडळ पुढे सरसावले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.