मराठा आरक्षण

गेल्या काही दिवसापासून 'तो' फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि...

Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असतानाच  गेल्या काही दिवसात मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आली आहे. आता पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.

Oct 26, 2023, 01:36 PM IST

मनोज जरागेंचे लाड थांबवा अन् अटक करा, अन्यथा... गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे

Oct 26, 2023, 11:54 AM IST

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Oct 25, 2023, 11:31 PM IST

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Manoj Jarange Patil On  Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.

Oct 25, 2023, 08:52 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. 

Oct 24, 2023, 09:47 PM IST

Dasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!

Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.

Oct 24, 2023, 09:10 PM IST

Maharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?

Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.

Oct 23, 2023, 08:30 PM IST

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी पुढाऱ्यांनीना गावबंदी करण्यात आलीय.. गावच्या प्रवेशद्वारावरच राजकीय नेत्यांना प्रवेश नाही असे फलक झळकतायत. राज्यातील तब्बल साडेसहाशे गावांमध्ये नो एन्ट्रीचे बॅनर झळकले आहेत. 

Oct 21, 2023, 06:25 PM IST

डेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन

 

Oct 20, 2023, 09:55 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा नारायण राणेंनी केला,  कुणबी आणि मराठे वेगळे असेही ते म्हणाले. जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा असा खोचक सल्ला देखील राणेंनी जरांगेंना दिला आहे.

Oct 19, 2023, 06:28 PM IST

Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?

OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...

Oct 16, 2023, 09:14 PM IST

जरांगेंच्या बिनबुडाच्या गोष्टी, त्यांच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी केला पलटवार

Maratha Reservation: आज जरांगे बोलले त्या गोष्टीला कुठेही कायदेशीर कनेक्टिव्हीटी नाही. त्यांना फक्त गुन्हे परत घ्यायचे आहेत. त्यांचा आरक्षणाशी संबंध नाही, असे सदावर्ते म्हणाले. 

Oct 14, 2023, 01:33 PM IST

मराठा आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार, पण हे नेमकं काय?

Maratha Reservation: राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. 

Oct 14, 2023, 10:48 AM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST