Maratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं

Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.   

सायली पाटील | Updated: Oct 30, 2023, 12:45 PM IST
Maratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं  title=
Maratha reservation protestors put mla sokankes house on fire watch video

Maratha reservation : Maratha reservation : मराठा आरक्षणाता मुद्दा गेल्या दर दिवसागणिक आणखी पेट घेताना दिसत असून, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानं पुन्हा एकदा ही ठिणगी धुमसताना दिसू लागली आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी उचलून धरत गावबंदीही केल्याचं पाहायला मिळत असून, काही ठिकाणी नेतेमंडळी आणि शासकीय प्रतिनिधींनाही गावखेड्यांमध्ये आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सोमवारी मराठा आंदोलनाला अधिकत हिंसक स्वरुप प्राप्त झालं.  

माजलगावमध्ये ठिकठिकाणी आंदोलकांकडून वाहनांना आग लागण्यात आलेली आहे तर शहरात अनेक ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उसळल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आग लावली. तर, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरालादेखील पार्किंगच्या भागांमध्ये आग लावल्याचं वृत्त समोर आलं. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून राख झाल्याचं पाहायला मिळालं. 

सोळंके यांच्यावर इतका रोष का? 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून माजलगावातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या क्लिपमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा मराठा समाजाकडून करण्यात आला होता. याच रोषातून सोमवारी मराठा समाजातील आक्रमक आंदोलनांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढत दगडफेक सुरु केली. 

हेसुद्धा वाचा : 'मराठा आरक्षणाचा विषय आला अन् अजित पवारांना डेंग्यू झाला'; जरांगे-पाटलांच्या लेकीचा टोला

 

पोलिसांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्नही केला. पण, संतप्त जमावातील काहींनी पोलिसांना न जुमात घराचा गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. काचा फोडल्या आणि पार्किंगमध्ये उभी असणारी वाहनं फोडली. काही वाहनं पेटवली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मराठा समाजातील साधारण एक हजारहून अधिक आंदोलक सोळंके यांच्या घराभोवती गर्दी करून विरोध प्रदर्शन करताना दिसले. आंदोलकांची ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस यंत्रणांनाही काही आव्हानांचा सामना करावा लागला होता.