www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना-मनसेत मुंबईत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि मनसेवर मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केलीय.
शिवसेना आणि मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असून आता लोकांना त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरल्या नसल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगवालाय.
शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर अर्ज भरण्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्या वेळी शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाखोली वाहत झेंड्याच्या काठ्यांनी मारहाण केली. त्याच दरम्यान दगडफेक आणि शीतपेयांच्या बाटल्यांचा वर्षाव केला. यामध्ये पाच ते सहा लोक जखमी झालेत. राडेबाजीनंतर अनेक तिखट प्रक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रादेशिक प्रश्नांवर भांडणा-या पक्षांचे असंच भाडंण होतं असल्याचं सांगताना, असे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बनतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. तर ओल्ड कस्टम हाऊससमोरील राड्याप्रकरणी मनसे उमेदवार आणि पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केलीय.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय. तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा
काल मुंबईत झालेला राडा हा शिवसेना-मनसेमधला नसून महायुती आणि मनसेतला असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय... याला कारणीभूत असलेल्यांना जनताच धड़ा शिकवेल, असंही ते म्हणाले.
राज आणि उद्धव यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे आणि ज्या प्रकारची भाषणं सुरू आहेत, त्यामुळे अस्वस्थ व्हायला होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. तर घरातली भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात, असा टोला अजित पवारांनी राज आणि उद्धवना लगावलाय. कुणाचा वडा तेलकट आणि कुणाचं सूप चांगलं, या मुद्द्यावरुन राज्याचा विकास होतो का, असा सवालही त्यांनी केलाय. तर राज आणि उद्धव दोघांचं रक्त एकच आहे, दोघांनीही संयम बाळगायला हवा, असा सल्ला भुजबळांनी दिलाय.
शिवसेना-मनसेमध्ये झालेल्या राड्याचं खापर राष्ट्रवादीनं भाजपवर फोडलंय. भाजपमुळे दोन भावांमध्ये वाद झाला, आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं, नवाब मलिकांनी म्हटलंय. तर जनतेला ज्या मुद्द्यांशी देणंघेणं नाही, त्यावरच दोघेही भाऊ भांडत बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.