मनसे

'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!

मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.

Feb 25, 2015, 09:24 PM IST

मुंबई पालिका आयुक्तांना मनसेची कायदेशीर नोटीस

मुंबई मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे याना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पाठविण्याबाबत शिवसेनेची भूमिका मह्त्वाची ठरली. कारण LED दिव्यांबाबत मनसे-शिवसेनेत एकमत झाल्याने मनसेने नोटीसीचे पाऊल उचलले.

Feb 25, 2015, 08:12 AM IST

राज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या कार्टुनमध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.

Feb 18, 2015, 10:19 AM IST

दिल्लीतील पराभव हा नरेंद्र मोदींचाच - राज ठाकरे

दिल्ली विधानसभेत झालेला भाजपचा दणदणीत पराभव हा नरेंद्र मोदींचाच पराभव आहे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलंय. ही निवडणूक मोदी विरूद्ध केजरीवाल अशीच लढली गेली होती. सततचा जो चढ होता त्याला उतार लागलाय असं राज म्हणाले. 

Feb 10, 2015, 10:41 PM IST

पराभव दिल्लीत, गोंधळ गल्लीत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर लगेच उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने हतबल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निकालामुळे काहीसा दिलासा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. 

Feb 10, 2015, 07:30 PM IST

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळतायेत. अमित ठाकरे हे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेण्यासाठी मुंबई महापालिकेत पोहोचले. या भेटीत ते आयुक्तांपुढे आपल्या एका संकल्पनेचं सादरीकरण करणार आहेत. 

Feb 9, 2015, 04:35 PM IST

सत्तेत राहून कामं करता येईना, नगरसेवकांची 'मनसे' गोची!

नाशिकमध्ये विकास कामांच्या निधी वाटपावरून मनपा प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची धग सत्ताधारी मनसेला बसू लागलीय. सत्तेत राहून विकास कामं होत नसल्यानं मनसेचे गटनेते पदाचा राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर ज्यांच्याकडून जनतेची काम होत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लागावलाय.

Feb 4, 2015, 12:39 PM IST

'एआयबी'चे वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले...

अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' हा कार्यक्रमाचे व्हिडिओ तात्पुरते यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आलेत. 

Feb 4, 2015, 10:59 AM IST