मुंबई: दिल्ली विधानसभेत झालेला भाजपचा दणदणीत पराभव हा नरेंद्र मोदींचाच पराभव आहे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलंय. ही निवडणूक मोदी विरूद्ध केजरीवाल अशीच लढली गेली होती. सततचा जो चढ होता त्याला उतार लागलाय असं राज म्हणाले.
राजकारणात असे चढ-उतार येतच असतात, असंही म्हणायला राज ठाकरे विसरले नाहीत. दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. त्यातच आता राज ठाकरे यांनीही मोदींना पराभवासाठी जबाबदार ठरवलंय.
यापूर्वी सर्वप्रथम अण्णा हजारेंनी पराभव मोदींचा असं म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.