'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका!

मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.

Updated: Feb 25, 2015, 09:24 PM IST
'आयटीसी' हॉटलला मनसेचा दणका! title=

मुंबई : मनसेकडून मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे... त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकांची जोरदार रंगत पाहायला मिळतील, अशी चिन्हं दिसतायत.

परळच्या आयटीसी हॉटेलवर मनसेनं धडक देत शुक्रवारपर्यंत मराठीमध्ये पाट्या लावण्याचा अल्टिमेटमच दिलाय. अन्यथा इंग्रजी पाट्यांना डांबर फासण्यात येईल, असा इशारा मनसेनं दिलाय. 

दुकानं, सरकारी आणि खाजगी अस्थापना, हॉटल्स यांच्या नावाच्या पाट्या मराठीमध्ये करण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलाय. 

लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता मनसेला पुन्हा एकदा मराठीप्रेमाचा पुळका आल्याचं चित्र आहे. येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून पुन्हा मराठीच्या मुद्द्याला हवा दिली जात असल्याची चर्चा यामुळे रंगलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.