राज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या कार्टुनमध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.

Updated: Feb 18, 2015, 02:09 PM IST
राज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या भावचित्रामध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.

या भावचित्रामधून राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं सोमवारी कर्करोगानं मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर काल जन्मगाव अंजनी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका करणारं आणि दिल्ली विधानसभा निकालावरही व्यंगचित्र काढलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.