'एआयबी'चे वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले...

अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' हा कार्यक्रमाचे व्हिडिओ तात्पुरते यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आलेत. 

Updated: Feb 4, 2015, 10:59 AM IST
'एआयबी'चे वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले... title=

मुंबई : अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' हा कार्यक्रमाचे व्हिडिओ तात्पुरते यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आलेत. 

या कार्यक्रमाचे तीन व्हिडिओ यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आल्याचं सोशल वेबसाईटवरून 'All India Bakchod' या अकाऊंटवरून जाहीर करण्यात आलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, या वादग्रस्त व्हिडिओला 1 फेब्रुवारीपर्यंतच 7 दशलक्ष हिटस् मिळाले होते. २० डिसेंबरला मुंबईतील एका स्टेडियममध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. 

युथ आयकॉन समजल्या जाणाऱ्या कलाकारांनी स्टेजवर अश्लिल शेरेबाजी आणि अश्लील हावभाव करून टाळ्या मिळवल्यानं हा कार्यक्रम वादात सापडलाय. या कार्यक्रमाच्या स्टेजवर करण जोहर, रणवीर सिंग, अर्जून कपूर उपस्थित होते. तर प्रेक्षकांमध्ये दीपिका पादूकोण, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, जिमी शेरगील यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती नोंदवली होती. यासाठी, प्रत्येकी चार हजार रुपये दराने तिकीटविक्रिही करण्यात आली होती. 

याविरोधात ब्राम्हण सेवा संस्थानचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली आहे. तर, 'निर्माता करण जोहर, अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी जनतेची माफी मागावी.... अन्यथा मनसे त्यांचे चित्रपट राज्यात झळकू देणार नाही' असा इशारा मनसेनं दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.