पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्याचा अखेरचा दिवस, ढाकेश्वरी मंदिरात पूजा

बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी ढाकेश्वरी देवीची पूजाअर्चा केली. राजा बल्लाल सेन यानं हे ढाकेश्वरी मंदिर बनवलं असून ते ८०० वर्ष जुनं आहे. मंदिर प्रशासनाकडून यावेळी मोदींचा सन्मान करण्यात आला.

Updated: Jun 7, 2015, 04:08 PM IST
पंतप्रधानांच्या बांग्लादेश दौऱ्याचा अखेरचा दिवस, ढाकेश्वरी मंदिरात पूजा title=

ढाका: बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी ढाकेश्वरी देवीची पूजाअर्चा केली. राजा बल्लाल सेन यानं हे ढाकेश्वरी मंदिर बनवलं असून ते ८०० वर्ष जुनं आहे. मंदिर प्रशासनाकडून यावेळी मोदींचा सन्मान करण्यात आला.

ढाकेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ढाक्यातल्या रामकृष्ण मिशन मठाला भेट दिली. यावेळी मोदींनी मठातल्या नागरिकांची भेट घेतली. तसंच मठात मोदींनी ध्यान करत प्रार्थना सभेतही सहभाग घेतला. मठातून बाहेर आल्यानंतर उपस्थित बांग्लादेशी नागरिकांशी मोदींनी संवाद साधला. मठाच्यावतीनं यावेळी मोदींचा सन्मान करण्यात आला.

ढाकेश्वरी देवी आणि रामकृष्ण मिशन मठाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढाक्यातील भारतीय दूतावासाला भेट दिली. यावेळी मोदींनी भारतीय दूतावासाच्या नवीन ऑफिसचं उदघाटन केलं. तसंच इथल्या कर्मचाऱ्यांनाही मोदी भेटले. 

दुपारच्या सुमारास मोदींनी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमिद यांची भेट घेतील. यानंतर बंगभवन इथं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा गौरव करण्यात येणार आहे. वाजपेयींना फ्रेंड्स ऑफ बांग्लादेश लिबरेशन वॉर अॅवॉर्ड या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्याला मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बंगबंधू इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये उपस्थितांना मोदी संबोधित करतील. 

याशिवाय बांग्लादेशचे विरोधी पक्ष नेते आणि बड्या उद्योगपतींचीही मोदी भेट घेतील. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्या खलिदा जिया यांचीही मोदी भेट घेतील. संध्याकाळी एका सांस्कृतिक सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. त्यानंतर सातच्या सुमारास मोदी भारताकडे रवाना होतील.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.