भारत-बांग्लादेश एकमेव कसोटी अनिर्णित!

भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला असून त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. या कसोटीत आर. अश्विननं पाच तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेत बांग्लादेश संघाचा धुव्वा उडवलाय. हरभजन सिंगनं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केलय.

Updated: Jun 14, 2015, 06:02 PM IST
भारत-बांग्लादेश एकमेव कसोटी अनिर्णित! title=

फातुल्ला: भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला असून त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. या कसोटीत आर. अश्विननं पाच तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेत बांग्लादेश संघाचा धुव्वा उडवलाय. हरभजन सिंगनं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केलय.

भारत-बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना फातुल्ला इथं सुरू होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच पावसानं हजेरी लावल्यामुळे क्रिकेटरसिकांची चांगलीच निराशा झाली होती. शिखर धवननं 173 तर मुरली विजयनं 150 धावा करत पहिल्या डावात 462 धावांचे मोठं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पेलत मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांना अश्विन आणि हरभजननं चांगलाच दणका दिलाय.

आजच्या पाचव्या दिवशीच्या खेळातही सकाळपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे बांग्लादेशला 256 धावांवर थांबवण्यात भारतीय गोलंदाजाना यश आलं. बांग्लादेशला फॉलोऑन दिल्यानं दुसऱ्या डावात बांग्लादेशचे खेळाडू पुन्हा मैदानात आले. यावेळी बांग्लादेशनं बिन बाद 23 धावा केल्या परंतु कमी प्रकाशामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.