मीरपूर : भारत-बांग्लादेश दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात बांग्लादेशनं भारताल ७९ रन्सनं धोबीपछाड दिली. पण, याच मॅचमध्ये प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा एक प्रसंग घडला.
या मॅचमधून आपला डेब्यू करणाऱ्या बांग्लादेशचा १९ वर्षांचा खेळाडू मुस्ताफिजुर रहमान याला रन करताना २५ व्या ओव्हरला धोनीनं जोरदार टक्कर मारली. यामध्ये रहमान जखमी झाला... आणि त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं.
पण, खरं म्हणजे धोनीनं असं करून रहमानला चांगलाच धडाही शिकवला. कारण, मुस्तफिजुर बॉलिंग करायला आला तेव्हापासूनच तो रन करताना बॅटसमनच्या मध्ये मध्ये येत होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंना रन करताना अडचण येत होती. यासाठी अम्पायरनंही रहमानला समज दिली होती. पण, तो काही ऐकेना... मग काय, कॅप्टन कूल धोनीनंच त्याला आपल्या स्टाईलननं चांगलीच समज दिली.
या घटनेनंतर रहमानला उपचारासाठी बराच वेळ मैदानाबाहेर राहावं लागलं. पण, ३७ व्या ओव्हरला तो पुन्हा मैदानात परतला... आणि त्यानंतर त्यानं रैना, अश्विन आणि जडेजाचीही विकेट काढून आपले पाच विकेट पूर्ण केले.
यासाठीच त्याला पहिल्याच मॅचमध्ये 'मॅन ऑफ द मॅच'ची उपाधीही मिळाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.