www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ फेब्रुवारी रोजी होणार्या सभेसाठीच्या जागेचा शोध शनिवरी अखेर संपला. आता ही सभा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. तसं पत्र एसपी कॉलेज प्रशासनाने दिलं आहे. त्यामुळे सभेबाबतच संभ्रम संपलाय.
राज यांची सभा मुठा नदीपात्रावरच होण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. डेक्कन जिमखाना परिसरात मनोरंजन नगरीच्या मागील बाजूस ही सभा होणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस दीपक पायगुडे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंतर सूत्रे हललीत.
राज्यभरातील टोलफोड आंदोलनानंतर आपली भूमिका आपण पुण्यात जाहीर सभेत सांगणार असल्याचे ठाकरे यांनी मागील आठवड्यात सांगितले होते. मनसेकडून शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुराम भाऊ (एस.पी.) महाविद्यालयाच्या मैदानाची मागणी केली होती. मात्र, आधी मैदान देण्याची तयारी दर्शविलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीने रविवारी अचानक मैदान न देण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सभा कोठे होणार असा संभ्रम होता. मात्र, एसपीने परवानगीचे पत्र दिल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>