मोदी म्हणतात; दोषी असेन तर फासावर चढवा
‘गुजरात दंगलीसाठी मी दोषी असेल तर मला फासावर चढवा’, असं वक्तव्य केलंय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी. एका वर्तमानपत्राला मुलाखत देत असताना मोदींनी हे वक्तव्य केलंय.
Jul 26, 2012, 11:54 AM ISTटीम अण्णांच्या आंदोलनाचा पहिला दिवस
प्रभावी लोकपाल विधेयक आणि १४ मंत्र्यांविरोधात कारवाई या मागणीसाठी टीम अण्णानं जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारनं दरवेळी फसवणूक केल्याचा आरोप करत, यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावरून हटणार नसल्याचा इरादा टीम अण्णानं व्यक्त केलाय.
Jul 26, 2012, 08:25 AM ISTपवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?
शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.
Jul 25, 2012, 12:39 PM ISTअण्णा दिल्लीकडे रवाना
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.
Jul 24, 2012, 04:02 PM ISTनेमकं काय हवंय शरद पवारांना...
आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.
Jul 20, 2012, 09:29 PM ISTराष्ट्रपती निडवणुकीचे आज मतदान
राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.
Jul 19, 2012, 12:03 PM IST'टू जी घोटाळा - कर्ताधर्ता प्रमोद महाजन'
टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआय एक चार्जशीट दाखल करणार आहे. ही चार्जशीट तीन खाजगी सेल्युलर कंपनी आणि माजी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल होणार आहे.
Jul 18, 2012, 12:11 PM ISTअन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?
देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2012, 09:30 PM IST'रोमिंग चार्जेस'पासून सुटका...
देशातल्या तमाम मोबाईलधारसाठी एक खुषखबर... आता, तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी तुम्हाला मोबाईलसाठी रोमिंग चार्जेस द्यायची गरज लागणार नाही.
May 31, 2012, 03:40 PM ISTदूध आंदोलनकर्त्यांनाही केलं अटक
दिल्लीतल्या दूध डेअरीचालकांविरोधात ग्वाला गद्दी समितीन आंदोलन तीव्र केलं. जंतरमंतरवर उपोषणानंतर दूध उत्पादक संसदेला घेराव घालण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली.
May 21, 2012, 10:58 PM ISTमाझ्या जीवाला धोका - मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.
May 2, 2012, 02:26 PM ISTसचिनने घेतली सोनियांची भेट
मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Apr 26, 2012, 02:23 PM ISTसंसदेत दूध भसळीचा मुद्दा
देशात सुरु असलेल्या दूधातील भेसळीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आलाय. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार रामकृपाल यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
Apr 25, 2012, 03:18 PM ISTआमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे
मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.
Apr 23, 2012, 02:18 PM ISTदिल्लीत भाजपचा काँग्रेसला हादरा
नवी दिल्लीची सत्ता पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात भाजपला यश येण्याची शक्यता आहे. भाजपने चारही महानगरनिगममध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मोठा धक्का आहे. भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
Apr 17, 2012, 05:48 PM IST