'टू जी घोटाळा - कर्ताधर्ता प्रमोद महाजन'

टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआय एक चार्जशीट दाखल करणार आहे. ही चार्जशीट तीन खाजगी सेल्युलर कंपनी आणि माजी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल होणार आहे.

Updated: Jul 18, 2012, 12:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआय एक चार्जशीट दाखल करणार आहे. ही चार्जशीट तीन खाजगी सेल्युलर कंपनी आणि माजी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल होणार आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप सरकारच्या कार्यकालात प्रमोद महाजन दूरसंचार मंत्री होते. आणि याच काळात टू जी स्पेक्ट्रमच्या वाटपात घोळ झालेला आढळलाय. एका वर्तमानपत्रानं तर सीबीआय सूत्रांच्या माहितीचा संदर्भ देत प्रमोद महाजन यांनीच या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचं म्हटलंय.

 

या वर्तमानपत्राच्या म्हणण्यानुसार सीबीआयनं या प्रकरणात पत्रकार आणि माजी दूरसंचार मंत्री अरुण शौरी यांना मात्र क्लिन चिट दिलीय. शौरी हे २००३-२००४ या काळात दूरसंचार मंत्री म्हणून कार्यरत होते. या चार्जशीटमध्ये दूरसंचार विभागाचे माजी सचीव श्यामलाल घोष, भारत संचार निगम लिमिटेडचे माजी निर्देशक जे. आर. गुप्ता यांच्या नावाचाही समावेश आहे. याचबरोबर भारती एअरटेल, हचसन एस्सार (आत्ता व्होडाफोन), स्टर्लिंग सेल्युलर या दिल्ली आणि मुंबईच्या कंपन्यांचाही या चार्जशीटमध्ये समावेश असणार आहे.

 

सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रमोद महाजन यांच्या सांगण्यानुसारच माजी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त स्पेक्ट्रमचं वाटप केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार महाजन यांच्या सांगण्यानुसारच नोकरशहांनी या तीन खाजगी कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी हा सगळा उपद्व्याप घडवून आणला.

 

.