झी मराठी

'झी मराठी'च्या लोकप्रिय जोड्या

लोकप्रिय मालिकांमधल्या लोकप्रिय जोड्या

Sep 27, 2017, 05:41 PM IST

...म्हणून राणा दा आणि अंजली बाई 'तिला' रोज शेकहॅंड करतात

 सेलिब्रिटींचे फॅन त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. हो पाहून कधीकधी सेलिब्रीटीही आवाक् होऊन जातात. अशीच एक चिमुकल्या फॅनचा चेहरा जगासमोर आला आहे. ही चिमुकली फॅन आहे ती राणा दा आणि अंजली बाईंची. सिरअलच्या शुटींगच पॅकअप झाल्यानंतर या फॅनला शेकहॅंड केल्याशिवाय राणा दा आणि अंजली बाई तिथून निघत नाहीत अशी पक्की खबर आली आहे. 

Sep 19, 2017, 08:56 PM IST

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट ‘तुझं माझं ब्रेक अप’

 प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो.

Sep 15, 2017, 07:34 PM IST

शिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर

छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. 

Sep 12, 2017, 03:30 PM IST

संभाजी' महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे

 झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ' संभाजी' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे. 

Sep 11, 2017, 11:16 PM IST

‘खुलता कळी खुलेना’घेणार प्रेक्षकांचा निरोप

 मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या‘खुलता कळी खुलेना’मालिकेने एक वर्ष पूर्ण केले आहे. 

Sep 1, 2017, 08:34 AM IST

'तुझं-माझं ब्रेकअप'- झी मराठीवर प्रेक्षकांंच्या भेटीला नवी मालिका

मोनिका, विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती फिरणारी 'खुलता कळी खुलेना..' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Aug 30, 2017, 05:11 PM IST

स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान : उंच माझा झोका पुरस्कार

सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन  ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल  सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

Aug 21, 2017, 06:47 PM IST

टीआरपी : 'गाव गाता गजाली' टॉप ५मध्ये

कोकणातील इरसाल माणसे आणि त्यांच्या गजाली यावर आधारित 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

Aug 17, 2017, 06:48 PM IST

झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतु वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून. येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Jul 20, 2017, 04:31 PM IST

चूकभूल द्यावी घ्यावी’घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील चूकभूल द्यावी घ्यावी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Jul 16, 2017, 05:14 PM IST

शनायाने 'त्या'ला गिफ्ट देण्यासाठी चोरले होते घरातून पैसे

झी मराठीवर येत्या २५ जूनला ती सध्या काय करते याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. पहिल्या प्रेमाची गोष्ट यात सांगण्यात आलीये.

Jun 23, 2017, 07:51 PM IST

थुकरटवाडीत अवतरला मराठी 'भाऊबली'

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील, याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे... आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'बाहुबली २' या चित्रपटाचं मराठमोळं रुप.

Jun 8, 2017, 07:09 PM IST

काय आहे लागीरं झालं जी... खरी कथा...

वीरांचा गौरव करणारी एक आगळीवेगळी मालिका येत्या महाराष्ट्र दिनी झी मराठीवर

 

Apr 28, 2017, 08:34 PM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी राणादा आणि अंजलीबाईंची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. 

Mar 30, 2017, 01:37 PM IST