टीआरपी : 'गाव गाता गजाली' टॉप ५मध्ये

कोकणातील इरसाल माणसे आणि त्यांच्या गजाली यावर आधारित 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

Updated: Aug 17, 2017, 06:52 PM IST
टीआरपी : 'गाव गाता गजाली' टॉप ५मध्ये title=

मुंबई : कोकणातील इरसाल माणसे आणि त्यांच्या गजाली यावर आधारित 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

गावात घडणारे वेगवेगळे किस्से आणि त्याच्या गजाली या मालिकेत दाखवले जातायत. प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळू लागलीये.

टीआरपीच्या रेटिंगमध्ये गाव गाता गजाली या मालिकेने टॉप ५मध्ये स्थान मिळवलेय. या मालिकेतील पात्रेही मजेशीर आहेत. टीआरपीमध्ये राणदा-अंजलीबाईंची 'तुझ्यात जीव रंगला' अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर 'माझ्या नवऱ्याची बायको', तिसऱ्या स्थानावर 'चला हवा येऊ द्या भारत दौरा', चौथ्या स्थानावर 'लागिर झालं जी' आणि पाचव्या स्थानावर 'गाव गाता गजाली' ही मालिका आहे.

याआधीही कोकणतीलच 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली होती. ही मालिकाही प्रेक्षकांना आवडली होती.