‘खुलता कळी खुलेना’घेणार प्रेक्षकांचा निरोप

 मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या‘खुलता कळी खुलेना’मालिकेने एक वर्ष पूर्ण केले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 1, 2017, 08:34 AM IST
‘खुलता कळी खुलेना’घेणार प्रेक्षकांचा निरोप title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘खुलता कळी खुलेना’आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या‘खुलता कळी खुलेना’मालिकेने एक वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या वर्षभरात ही मालिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली. 
आता या मालिकेच्याजागी ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही नवी मालिका १८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गाव गाता गजाली’ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. तसेच निर्मिती सांवत यांच्या प्रमुख भुमिकेतील ‘जाडूबाई जोरात’ या मालिकाही दरम्यानच्या काळात सुरु झाली आहे. आता‘तुझं माझं ब्रेकअप’प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. 

मोनिका चालली वेबसिरीजमध्ये 

‘खुलता कळी खुलेना’मालिकेत  मोनिका म्हणजेच अभिज्ञा भावे हिचा अभियनय लक्षवेधी ठरला. यापुढे मोनिका आपल्याला एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. लग्नाच्या वयात आलेल्या मुलीसाठी तिचे आई-बाबा वरसंशोधन करतात तेव्हा ती मुलगी कोणत्या मानसिकतेतून जात असते यावर आधारित ही वेबसिरीज असणार आहे.