'तुझं-माझं ब्रेकअप'- झी मराठीवर प्रेक्षकांंच्या भेटीला नवी मालिका

मोनिका, विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती फिरणारी 'खुलता कळी खुलेना..' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 30, 2017, 05:11 PM IST
 'तुझं-माझं ब्रेकअप'- झी मराठीवर प्रेक्षकांंच्या भेटीला नवी मालिका  title=

मुंबई : मोनिका, विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती फिरणारी 'खुलता कळी खुलेना..' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

त्याजागी 'तुझं-माझं ब्रेकअप' ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.   
प्रेम, ब्रेकअप आणि लग्न या विषयाभोबती फिरणार्‍या 'तुझं-माझं ब्रेकअप' या नव्या मालिकेच्या प्रोमोजने रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. येत्या  १८ सप्टेंबरपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार असल्याने 'खुलता कळी खुलेना' मालिका बंद होणार आहे. केतकी चितळे आणि साईकित कामत ही फ्रेश जोडगोळी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. साईकित याआधी 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून 'अभिराम'च्या भूमिकेतून आपल्या भेटीला आला होता.

'खुलता कळी खुलेना' या मालिकेचं टायटल सॉंग आणि सॅन्ड आर्ट स्टाईलमध्ये झालेलं चित्रीकरण हा टेलिव्हिजन विश्वातील हटके प्रयोग होता. प्रेक्षकांनीही त्याला अल्पावधीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. नुकताच या मालिकेतील कलाकारांनी सेटवर वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले होते.