छेडछाड

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.

Oct 16, 2013, 12:34 PM IST

लेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांची पुन्हा छेडछाड

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत परदेशी पर्यटक अजूनही सुरक्षित नसल्याचाच प्रकार उघड झालाय. नुकतंच एका परदेशी जोडप्याला एकांतात गाठून त्यांना अश्लील हावभाव करत त्यांच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.

Oct 4, 2013, 09:58 PM IST

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

आपल्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला मॉडेल रोझलीन खान हिनं चांगलाच धडा शिकवलाय.

Oct 3, 2013, 11:45 AM IST

वांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप

मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.

Oct 1, 2013, 09:41 PM IST

शालेय मुलींच्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ

मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.

Sep 29, 2013, 07:51 PM IST

महिलेची छेड रोखणाऱ्या शिवसैनिकाची हत्या!

महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या कारणावरून शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. देवा खांडेकर असं या शाखा प्रमुखाचे नाव आहे.

Sep 23, 2013, 05:15 PM IST

…आणि मल्लिका शेरावतनं काढला पळ!

`भंवरी देवी` या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी जयपूरला गेलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत ही अतिशय दुःखी अवस्थेत परत आली आहे. मल्लिका शूटींगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्या हॉटेलमध्ये अचानक पणे दारू पिऊन काही लोकांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनी त्यांच्या तावडीतून सुटून मल्लिकानं चक्क हॉटेलमधून पळ काढला.

Aug 19, 2013, 12:22 PM IST

दिल्लीमध्ये विदेशी तरुणीसोबत अश्लील कृत्य

निजामुद्दीन येथे एका विदेशी तरुणीचं भर रस्त्यात अपहरण करण्याचा तसंच विनयभंग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणी जर्मनीची आहे.

Aug 10, 2013, 05:41 PM IST

`छेडछाड नाही, प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर विद्यापीठात प्रवेश`

दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक महत्तवाची बातमी आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी छेडछाड करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र आता केवळ विद्यार्थ्यांना नाही तर विद्यार्थीनींनाही द्याव लागणार आहे. रामजस महाविद्यालयानं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलंय.

Jun 29, 2013, 03:10 PM IST

मुलींनी रस्त्यात घातला दारू पिऊन धुडगूस

डेहराडूनमध्ये काही विद्यार्थिनींनी दारू पिऊन धिंगाणा घातला. आधी आपल्या कारने बाइकस्वारांना धडक दिली. नंतर भर रस्त्यात धुडगूस घातला. या सर्व आरोपी मुली राजकीय कुटुंबांशी संबंधित आहेत.

May 19, 2013, 06:09 PM IST

छेडछाडीबाबत जाब विचारला, तरूणाला घातली गोळी

नागपुरात अवघ्या ६ तासांत २ गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारण्याला गोळी घातल्याची घटना घडली आहे.

Apr 18, 2013, 11:11 AM IST

हर्षलानं रोडरोमिओला शिकवला चांगलाच धडा

रस्त्यावर तरुणींची छेडछाड ही जणू काही आता नेहमीचीच गोष्ट झालीय. हाच अनुभव एका राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूनलाही आला. मात्र, तीनं या प्रसंगाला धाडसानं उत्तर देत एक धडाच तरुणींना दिलाय.

Apr 3, 2013, 12:48 PM IST

`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`

भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.

Mar 20, 2013, 11:53 AM IST

छेडछाडीच्या आरोपाखाली पहिली अटक...

केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या छेडछाड प्रतिबंधक कायद्यानुसार पहिलीच अटक ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालीय. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांनी नव्या कायद्याची अंमलबजावणी करत या कायद्याचा श्रीगणेशा केलाय.

Mar 16, 2013, 05:05 PM IST

मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात तुफान दगडफेक

जुने नाशिक परिसरात शाळकरी मुलांमधल्या वादाचं पर्यवसान वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीत झालं. मुलीची छेड काढण्यावरून हा प्रकार घडला.

Jan 17, 2013, 11:18 AM IST