‘शेजार’वैर नाही फायद्याचं!
पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत.
Jan 9, 2013, 03:56 PM ISTचीन ‘हायस्पीड’... सर्वात मोठा बुलेट ट्रेन मार्ग खुला
चीनमध्ये सर्वाधिक दूरवर जाणारा हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनचा मार्ग खुला झालाय. चीनची राजधानी बिजींग आणि ग्वांगजो या दोन शहरांना जोडणारा हा मार्ग आहे.
Dec 27, 2012, 11:29 AM IST'सुपर सीरिज बॅडमिंटन`मधून सायना बाहेर
विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मात पत्करावी लागलीय. त्यामुळे सायनाचं पहिलं-वहिलं विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनचा किताब जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.
Dec 15, 2012, 10:25 PM IST...तर चीनलाही मागे टाकू- रतन टाटा
व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, तर भारतीय उद्योग चीनसारख्या देशालाही सहज मागे टाकू असं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य करताना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील लाल फितीच्या कारभारावर टीका केली आहे.
Dec 9, 2012, 04:53 PM ISTपाकिस्तान भ्रष्टाचारात भारताच्या पुढे
चीनलाही भारताने आता भ्रष्टाचारामध्ये मागे टाकलं आहे. मात्र भारताशेजारील तुलनेने लहान असणऱ्या पाकिस्तानात भारताहूनही जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Dec 5, 2012, 06:48 PM ISTचमत्कार घडणार, चंद्रावर चक्क भाजी पिकणार!
अवकाशामध्ये शेती हे ऐकून विचित्र वाटतं ना! पण हे खरं आहे. पण भविष्यात अवकाशात झेपावणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्र, मंगळावर अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यसाठी चीनमधील प्रयोगशाळेत यावर आश्चर्यजनक प्रयोग सुरू झाले आहेत.
Dec 3, 2012, 04:04 PM ISTये दिल माँगे मोअर…
१९६२ च्या चिनी आक्रमणाला ऑक्टोबरमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील. या युद्धापासून आपण काय बोध घेतला.
Sep 24, 2012, 05:14 PM ISTचीनी वृत्तपत्राने केली भारतीयांवर वंशवादी टिप्पणी
चीनमधल्या ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्राने भारतीयांच्या दागिने घालण्याच्या सवयीवरून वंशवादी शेरेबाजी केली आहे. या वृत्तात भारतीय लोकांच्या काळ्या रंगावर टिप्पणी केली आहे.
Aug 29, 2012, 03:48 PM ISTवान्या होणार ‘मिस वर्ल्ड २०१२’?
यंदाचा मिस वर्ल्ड किताब कोण जिंकणार ते आज ठरणार आहे... कारण ६२ वी ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा आज रंगणार आहे ती चीनमध्ये...
Aug 18, 2012, 10:16 AM ISTभारत-चीन होणार वॉर, ‘रॉ’ने केले खबरदार!
भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून भारताला उत्तेजित करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत असून चीन सध्या भारताविरोधात युद्धाच्या तयारीत असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटना असलेल्या रॉ ने दिला आहे.
Jul 10, 2012, 07:00 PM ISTअंतराळात मिळाला पहिला ई-मेल
पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी नुकतंच एक यानं चीननं धाडलंय. या आकाश केंद्र तियांगोंग -१ मध्ये चीनच्या अंतराळवीरांना मंगळवारी पहिल्यांदाच पृथ्वीवरून धाडलेला एक ई-मेल मिळालाय.
Jun 20, 2012, 02:17 PM ISTउ. कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत - चीन
उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केरण्याचा प्रयत्न केला. मात्र , याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. उत्तर कोरियाने आपल्याकडील अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा सल्ला चीनने दिला आहे. त्यामुळे चीन आणि उ. कोरिया यांच्यातील संबंध बिघडण्यास होण्याची शक्यता आहे. चीनचा सल्ला उ. कोरिया किती मनावर घेईल, याबाबत शंका आहे.
Apr 19, 2012, 12:26 PM ISTसमुद्र नाही चीनच्या बापाचा - भारताने फटकारले
दक्षिण चीनमधील समुद्र ही जगाची संपत्ती असून त्यास व्यापारासाठी मुक्त केले जावे, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटले आहे. दक्षिण चीनचा समुद्र कोणाची जागीर नाही, असे सडेतोड उत्तर कृष्णा यांनी चीनला दिले आहे.
Apr 6, 2012, 08:47 PM ISTभारताला चीनची धमकी, तेल काढू नका
चीनने भारताला पुन्हा धमकावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीमधील समुद्रातून तेल भारताने तेल काढले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनमधील एका अधिकाऱ्याने दिला आहे.
Apr 5, 2012, 06:01 PM ISTअमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता
अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
Mar 30, 2012, 11:57 AM IST