www.24taas.com, बीजिंग
चीनमधल्या ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्राने भारतीयांच्या दागिने घालण्याच्या सवयीवरून वंशवादी शेरेबाजी केली आहे. या वृत्तात भारतीय लोकांच्या काळ्या रंगावर टिप्पणी केली आहे.
भारतीय लोक काळे असतात. त्यामुळे त्यांच्या काळ्या रंगावर दागिन्यांचा पिवळा रंग चांगला दिसतो. म्हणून ते भरपूर दागिने घालतात. भारतीय घरातल्या स्त्रिया नाकात नथ घातल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. असं या वृत्तात म्हटलं आहे.
उदाहरणादाखल भारतीय अभिनेत्रीचा फोटो छापलेला आहे. वृत्तात असंही लिहिलं आहे की भारतातल्या भिकारीमुलींनासुद्धा दागिन्यांनी इच्छा असते. भारतीय पुरूषही दागिने घालतात. त्यांच्या सर्व बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या असतात. भारतीय लोकांचा रंग काळा असल्यामुळे त्यांच्या गळ्यात पिवळं सोनं उठून दिसतं. कानातले सोन्याचे दागिनेही चमकतात.
सोनं म्हणजे भारतीय लोकांसाठी गुंतवणूक असते. सोन्याचं भांडवल केलं जातं. लग्नातही सोनंच दिलं जातं. भारताचं सरकारही भारतीयांना सोन्याचे दागिने अधिक घ्यावेत, यासाठी प्रोत्साहन देत असतं.