www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज नारायण राणे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोकणाच्या विकासाआड कोणी येत असेल तर मी गप्प बसणार नाही. वेळप्रसंगी मी आपल्या पदाचा राजीनामा देईन आणि जनतेबरोबर आंदोलनात उतरेन, हे लक्षात ठेवा. हा इशारा कस्तुरीरंगन समिती अहवालानंतर दिला आहे. कस्तुरीरंगन समितीवरून राणे आक्रमक झाल्याचे मंत्रीमंडळ बैठकीत दिसले.
कोकणाचा विकास होत नसेल तर उपयोग काय? कोकणचा विकास झाला पाहिजे. मी, कोकण विकासासाठी कोणी आड येत असेल तर ते जमणार नाही. वेळप्रसंगी मी राजीनाम देईन, अशी धमकी राणे यांनी दिली. कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे राणे प्रचंड नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड केली. या निर्णयामुळे कोकणचा विकास ठप्प होईल, अशी भीती राणे यांनी व्यक्त केली.
वनविभागाचे अधिकारी पुन्हा कोकणात गेल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, अशा गर्भित इशाराही राणे यांनी यावेळी दिला. मी राजीनामा देऊन कस्तुरीरंगन समितीविरोधात आंदोलन करीन, असे राणे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतच बजावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कस्तुरीरंगन समितीचा अहवाल स्वीकार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.