काळे पैसे पांढरे करताना मराठी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं
आपल्या घरात असलेले काळे पैसे पांढरे करण्याच्या प्रयत्नात असताना एका मराठी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडण्यात आलंय.
Nov 23, 2016, 04:17 PM ISTनोटाबंदीविरोधात 28 रोजी विरोधकांचा देशात 'आक्रोश दिन'
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
Nov 23, 2016, 03:21 PM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
Nov 23, 2016, 12:16 AM IST...आणि देवदूतासारखी दारात अवतरली बँक!
खिशात रोख रक्कम नसल्यानं तुमचं काम अडलंय आणि घराच्या खाली असलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांग आहे. त्यामुळे पैसे तात्काळ मिळण्याची सुतरामही शक्यता नाही, अशा वेळी जर तुम्हाला अचानक कुणीतरी 100 रुपयांच्या 20 नोटा हातात दिल्या तर... निश्चितच तुम्हाला आनंद होईल... आणि असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना आलाय...
Nov 22, 2016, 09:28 PM ISTडेबिट कार्डाच्या साहाय्यानं 'बिग बझार'मधून काढा 2000 रुपये!
'नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'बिग बझार'नं आपल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिलीय.
Nov 22, 2016, 09:07 PM ISTलग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...
लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत.
Nov 22, 2016, 06:19 PM ISTनोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.
Nov 22, 2016, 03:29 PM ISTमुंबईत बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार उघड, दोघांना अटक
बॅंकाबाहेरील लांबच लांब रांगाचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरांत हा प्रकार उघडकीस आला. पण, बॅंक कर्मचा-यांनी आणि पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्याने त्या बनावट तस्करांचा नोटा बदलीचा आणि बॅंकेत भरण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
Nov 22, 2016, 03:24 PM ISTनोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
Nov 22, 2016, 02:26 PM ISTलातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
Nov 22, 2016, 01:23 PM ISTनोटाबंदी : गोंधळ दूर करण्यासाठी 2000ची नोट बंद करुन 200ची छापा : पृथ्वीराज चव्हाण
भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच दोन हजारची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Nov 22, 2016, 01:09 PM ISTसहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
Nov 22, 2016, 09:01 AM ISTनोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय.
Nov 22, 2016, 08:40 AM IST