मुंबई : 'नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 'बिग बझार'नं आपल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी दिलीय.
आपल्याकडे असलेल्या डेबिट कार्डाच्या साहाय्यानं तुम्ही 'बिग बझार'च्या दुकानांतून 2,000 रुपये काढू शकणार आहात. येत्या गुरुवारी म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
त्यावर तुमचा पिन कोड नंबर टाकून... तुम्ही 2000 रुपये काढू शकणार आहात. या सुविधेविषयी बिग बझारच्या कॅश काऊंटरवर तुम्हाला अधिक माहिती आणि साहाय्य मिळू शकेल.