मुंबई : भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच दोन हजारची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 2000 रुपयांची नोट रद्द करून 200ची नोट सुरू करण्याची मागणीही झी 24 तासवरील खास मुलाखतीत केली.
निवडणुकीत काळा पैसा यावा म्हणून नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच नोटाबंदीला रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा विरोध होता, त्यामुळे राजन यांना हटविण्यात आले, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'झी 24 तास'च्या खास मुलाखतीत केला. त्याचवेळी त्यांनी गोंधळ कमी करण्यासाठी 200 रुपयांची नोट छापून 2000ची बंद केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी मोदींना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे ग्रामीण भागात आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बॅंका नाहीत, एटीएम नाहीत. हातावर पोट चालणाऱ्यांचे हाल झाले आहे. मोदींच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मोदी सरकारने आर्थिक आणीबाणी आणली आहे, ग्रामीण भागात चित्र आज विदारक आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
काळा पैसा रोखायचा असेल तर प्रथम 2000 रुपयांची नोट बंद केली पाहिजे. नोटाबंदी योग्य आहे. जर 500, 1000 रुपयांची नोटा बंद केल्यात मग दुसऱ्या नोटा आणण्याची गरज नाही. आता जी चूक झाली आहे ती सुधारा. 500, 1000 या नोटा कायमच्या बंद करायला हव्यात. चलन सुरळीत राहण्यासाठी 50, 100, 200 रुपये हवेत. त्यामुळे 2000 रुपयांची नोट बंद करुन 200 रुपयांची नोट छापा, असा सल्ला मोदी यांना पृथ्वीराज चव्हाण यांना दिला.
भाजपला आगामी निवडणुकीसाठी काळापैशाचा वापर करायचा आहे. त्यासाठीच त्यांनी 2000 रुपयांची नवी नोट आणली आहे. तसेच या नोटेचा आकारही कमी केला आहे. कमी जागेत जास्त पैसा कसा राहिल, यासाठीच छोट्या आकाराची नोट छापली आहे. काळापैसा बाहेर काढण्यासाठी नव्हे तर त्याचा वापर भाजपला करावयाचा आहे, असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आजच्या निर्णयाने केवळ दीड टक्काच पैसा बाहेर येईल, असे ते म्हणालेत.
12:30 PM
मुंबई : निवडणुकीत काळा पैसा यावा म्हणून नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच नोटाबंदीला रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा विरोध होता, त्यामुळे राजन यांना हटविण्यात आले. - पृथ्वीराज चव्हाण
12:24 PM
मुंबई : नोटाबंदीचा निर्णय चांगला, मात्र सरकार गोंधळेले आहे. अंमलबजावणीत गोंधळ, तात्काळ 2000 रुपयांची नोट बंद केली पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण
12:23 PM
मुंबई : मोदी सरकारने आर्थिक आणीबाणी आणली आहे, ग्रामीण भागात चित्र आज विदारक आहे - पृथ्वीराज चव्हाण
12:21 PM
मुंबई : नोटाबंदी करायची होती ना मग 100च्या नोटा जास्त प्रमाणात छापायला हवा होत्या. तसेच 2000ची नोट बंद करुन 200 रुपयांची नोट छापायला हवी. 50, 100, 200 अशा नोटा चलनात जास्त प्रमाणात हव्यात - पृथ्वीराज चव्हाण
12:20 PM
मुंबई : भाजपला निवडणुकीसाठी काळा पैसा साठवायचा आहे. त्यासाठी 2000 रुपयांची नोट छापली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप