नवी दिल्ली : मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाले आहेत. आपला विरोध 'आक्रोश दिन' पाळून करणार आहेत. 28 रोजी संपूर्ण देशभरात सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे.
Delhi: TMC stage protest against Government's #demonetisation move at Jantar Mantar. pic.twitter.com/sLiAfbZOEX
— ANI (@ANI_news) November 23, 2016
नोटाबंदीला विरोध असलेले सर्वच पक्ष देशव्यापी आक्रोश दिनी रस्त्यावर उतरतील. काही ठिकाणी पक्षपातळीवर तर काही ठिकाणी एकत्रपणे हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी भूमिका सीराराम येचुरी यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर विरोधी पक्षांनी धरणे आंदोलन केल्यानंतर आता जंतरमंतर येथे तृणमूल काँग्रेसने आंदोलन सुरू केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी उपस्थित आहेत. तर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनीही जंतरमंतरवर हजेरी लावून आंदोलनाला पाठिंबा दिला.
Delhi: Jaya Bachchan joins TMC's protest against #DeMonetisation at Jantar Mantar pic.twitter.com/lWcDgpfVvK
— ANI (@ANI_news) November 23, 2016
आज सायंकाळी ४ वाजता काँग्रेस पक्ष मुख्यालय ते पंतप्रधान निवासस्थान, असा मोर्चा काँग्रेस काढणार आहे. यावेळी निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत.