नोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

Updated: Nov 22, 2016, 02:26 PM IST
नोटबंदी : मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट title=

मुंबई : शहरातील काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही मागण्यांचे निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही भेट घडवून आणली. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचं व्यापा-यांनी समर्थन केलं. इनकम टॅक्सचा स्लॅब कमी करावा, जीएसटी येईपर्यंत वॅट स्लॅब कमी करावा, चलन तुडवडा दूर करावा याकरता व्यापा-यांसाठी बॅंकामध्ये स्वतंत्र रांग ठेवावी, अशा व्यापा-यांच्या मागण्या होत्या. 

नोटबंदीच्या निर्णयावर नाराज होत काही व्यापा-यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता भाजपनं व्यापा-यांची ही भेट घडवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.