काळा पैसा

नोटांवरील बंदीच्या निर्णयाला रामदेव बाबांचे समर्थन

पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीला योगगुरु रामदेव बाबांनी समर्थन दिलंय. 

Nov 13, 2016, 01:23 PM IST

दिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा

पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय. 

Nov 13, 2016, 12:37 PM IST

नाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय. 

Nov 13, 2016, 12:11 PM IST

नागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था

नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत. 

Nov 13, 2016, 10:27 AM IST

जुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय. 

Nov 13, 2016, 09:52 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे. 

Nov 13, 2016, 08:55 AM IST

मोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.

Nov 13, 2016, 08:26 AM IST

कामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.

Nov 13, 2016, 08:07 AM IST

... आणि दोन रुपयाच्या नाण्यांची चिल्लर पडली हाती

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक तासनतास रांगा लावत आहेत.

Nov 13, 2016, 12:12 AM IST

राज्यात खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही!

राज्य सरकारने ९ तारखेला दिलेला आदेश स्थगित केला आहे. खासगी रूग्णालयांना जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्विकारण्यास सांगितले होते. परंतु या आदेशाला आज राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही.

Nov 12, 2016, 10:37 PM IST

शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Nov 12, 2016, 10:10 PM IST

बरेलीत गोणीत नोटा जाळल्या तर गंगा नदीच्या पात्रात लाखोंच्या 500,1000च्या नोटा

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Nov 12, 2016, 05:28 PM IST

काळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!

 पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.

Nov 12, 2016, 01:57 PM IST

बिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.

Nov 12, 2016, 09:47 AM IST

500, 1000च्या जुन्या नोटांतून राज्यात विविध करापोटी 8 तासांत 82 कोटी जमा

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत. 

Nov 11, 2016, 09:42 PM IST