मोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.

Updated: Nov 13, 2016, 04:37 PM IST
मोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत title=

मुंबई : ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.

बिग बॉसमध्ये बोलताना सलमान खानने पंतप्रधानाच्या नोटांवर बंदी आणल्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच काळ्या पैशावर घेतलेल्या या कारवाईला सॅल्यूटही केले. 

याआधी बिग बी अमिताभ बच्चन, आमिर खान यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाला पसंती दर्शवली होती तर दुसरीकडे अर्शद वारसीने मात्र या निर्णयाला विरोध केला.