शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Updated: Nov 12, 2016, 10:10 PM IST
शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार title=

मुंबई : 500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. यामुळे नागरिकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरीकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यानुसार नागरिकांनी 11 नोव्हेंबर रोजी 237 कोटी 43 लाख रूपयांचा भरणा केला होता. मालमत्ताधारक नागरिकांना महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी जुन्या चलनाने भरता यावी यासाठी आज सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवली होती. 

आज सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 40 कोटी 4 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. रविवार, सोमवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार असून 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येणार असल्याने आहे.