नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीला योगगुरु रामदेव बाबांनी समर्थन दिलंय.
देशाचे जवान सात-सात दिवस उपाशी राहून सीमांचं रक्षण करतात तर आपण देशासाठी थो़डा त्रास घेऊ शकत नाही का असा सवाल योगगुरु बाबा रामदेव यांनी उपस्थित केलाय.
या निर्णयामुळे देशातल्या जनतेला त्रास होत असला तरी सरकारकडून त्याबाबत पाऊलं उचलण्यात येत असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.