नाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप

५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय. 

Updated: Nov 13, 2016, 04:23 PM IST
नाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप title=

नवी दिल्ली : ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय. 

बँका तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या जातायत. यादरम्यान नागरिकांना दिलासा देणारी बातमी आलीये. नाशिक प्रेसमधून आरबीआयला नव्या नोटांची पहिली खेप पाठवण्यात आलीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयला ५० लाख किंमतीच्या ५०० रुपयांच्या नोटांची पहिली खेप पाठवण्यात आलीये. 

तसेच पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात नोटा या प्रेसमधून आरबीआयकडे पाठवल्या जाणार आहेत. दरम्यान, ही पहिली खेप आरबीआयला पाठवल्याने देशात नोटाची टंचाई थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते.