मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत. आज मध्यरात्रीपर्यंत ही रक्कम 120 कोटी पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी दिली. दरम्यान,रात्री 8.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 173 कोटी 28 लाख रुपयांचा जमा झाले आहेत.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यात. यामुळे नागरिकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरीकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाला विनंती केली होती. दरम्यान, ही मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत मोठ्ठा गल्ला जमा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
- 1000 व 500 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरीकांनी भरले 173 कोटी रुपये
- आज दिवसभर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात विविध करांचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी मोठया प्रमाणात गर्दी
- रात्री 8.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 173 कोटी 28 लाख रुपयांचा भरणा
- मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम 200 कोटी पर्यंत जाईल असा अंदाज
मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती केंद्र शासनाने मान्य केल्याने मालमत्ताधारक नागरिकांना महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी जुन्या चलनाने भरता यावी यासाठी आज 11 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत कार्यालये सुरु ठेवली आहे.
जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येत असल्याने आज दिवसभर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात विविध करांचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 82 कोटी 13 लाख 59 हजार रुपयांचा भरणा केला आहे.
मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम 120 कोटी पेक्षा अधिक होईल असा विश्वास सचिव म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका- 1 कोटी 97 लाख
- नवी मुंबई महानगरपालिका- 3 कोटी 3 लाख
- कल्याण-डोबिंवली महानगरपालिका - 5 कोटी 16 लाख
- मीरा-भाईंदर महानगरपालिका - 2 कोटी 3 लाख
- वसई- विरार महानगरपालिका- 2 कोटी 23 लाख
उल्हासनगर महानगरपालिका- 4 कोटी 50 लाख
- भिवंडी महानगरपालिका- 1 कोटी
- पुणे महानगरपालिका- 17 कोटी 60 लाख
- पिंपरी - चिंचवड महानगरपालिका - 5 कोटी 25 लाख
- ठाणे महानगरपालिका- 4 कोटी 25 लाख
- सांगली-कुपवाड महानगरपालिका - 1 कोटी 70 लाख
- कोल्हापूर महानगरपालिका- 51 लाख
- अहमदनगर महानगरपालिका- 1 कोटी 35 लाख
- नाशिक महानगरपालिका- 3 कोटी 50 लाख
- धुळे महानगरपालिका- 1 कोटी 9 लाख-
- जळगांव महानगरपालिका- 87 लाख 41 हजार
- मालेगांव महानगरपालिका- 75 लाख 54 हजार
- सोलापूर महानगरपालिका-1 कोटी 75 लाख
- औरंगाबाद महानगरपालिका- 1 कोटी 84 लाख
- नांदेड-वाघाळा महानगरपालिका- 1 कोटी 7 लाख
- अकोला महानगरपालिका- 55 लाख
- अमरावती महानगरपालिका- 1 कोटी 10 लाख
- नागपूर महानगरपालिका- 3 कोटी 55 लाख
- परभणी महानगरपालिका- 11 लाख 64 हजार
- लातूर महानगरपालिका- 62 लाख
- चंद्रपूर महानगरपालिका- 46 लाख
- राज्यातील सर्व नगरपालिका - 14 कोटी 28 लाख