काँग्रेस

धंगेकर काँग्रेसमध्ये पण 'दंगे' भाजपमध्ये...

मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय. 

Jan 30, 2017, 05:41 PM IST

सोलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का

काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय.

Jan 30, 2017, 05:14 PM IST

पुण्यात मनसेला धक्का, नगरसेवक रविंद्र धंगेकर करणार काँग्रेसमधे प्रवेश

पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसलाय. मनसेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर प्रवेश करणार. धंगेकर मनसेचे माजी गटनेते आहेत. त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूकही लढवली होती. 

Jan 30, 2017, 01:28 PM IST

काँग्रेस-सपाच्या आघाडीनं मुयालम नाराज, प्रचारही करणार नाहीत

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे

Jan 29, 2017, 09:57 PM IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का

 आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Jan 29, 2017, 06:58 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस साथसाथ

भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. 

Jan 29, 2017, 03:21 PM IST

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर हेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Jan 29, 2017, 08:23 AM IST

म्हणून नारायण राणे मुंबईत प्रचार करणार नाहीत

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 28, 2017, 03:59 PM IST