काँग्रेस-सपाच्या आघाडीनं मुयालम नाराज, प्रचारही करणार नाहीत

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे

Updated: Jan 29, 2017, 09:57 PM IST
काँग्रेस-सपाच्या आघाडीनं मुयालम नाराज, प्रचारही करणार नाहीत  title=

लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे, मात्र या नव्या आघाडीवर मुलायमसिंह यादव यांनी नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेसबरोबर सपाला आघाडीची गरज नव्हती असं विधान मुलायमसिंह यादव यांनी केलंय, तसंच आगामी निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलंय.

दरम्यान आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी एक साथ रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या रोड शो दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.